भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक म्हणून अंबानी कुटुंब ओळखले जाते. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी ( Anant Ambani) याचा साखरपुडा नुकताच पार पडला. राजस्थान येथील आलिशान हॉटेल मध्ये राधिका मर्चेंटसोबत ( Radhika Marchent) अनंतचा साखरपुडा पार पडला होता. यानंतर आता पुन्हा एकदा या दोघांच्या दुसऱ्या साखरपुड्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आज मिळणार, धनुष्यबाण नेमका कुणाचा? आज होणार सुनावणी
मुंबईतील अँटिलिया बंगल्यामध्ये अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे पार पडला आहे. गोल धना आणि चुनरी विधी या परंपरेप्रमाणे दोघांचा साखरपुडा झाला. या कार्यक्रमाला मुकेश अंबानी यांचे संपूर्ण कुटुंब हजर होते. साखरपुड्याच्या फोटोंमध्ये मुकेश अंबानी व नीता अंबानी, इशा अंबानी व आनंद पीरामल, आकाश अंबानी व श्लोका अंबानी हे लोक दिसत आहेत.
समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; खासगी बसला भीषण अपघात, १ जागीच ठार
दरम्यान अंबानींची धाकटी सून राधिका ही भारतामधील प्रमुख व प्रसिद्ध औषध कंपनी एनकोर हेल्थ केअर चे सीईओ उद्योगपती वीरेन मर्चेंट व शैला मर्चेंट यांची मुलगी आहे. विशेष गोष्ट म्हणजे राधिका व अनंत हे दोघेही लहानपणापासूनचे मित्र आहेत. 18 डिसेंबर 1994 रोजी राधिकाचा जन्म झाला असून ती क्लासिकल डान्सर आहे. जवळजवळ आठ वर्षे तिने भरतनाट्यमचचे शिक्षण घेतले आहे. मुंबईच्या श्री निभा आर्ट अकादमीत गुरु भावना ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तिने भरतनाट्यमचे धडे गिरवले आहेत.