भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक म्हणून अंबानी कुटुंब ओळखले जाते. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) याचा साखरपुडा नुकताच पार पडला आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटींचाही सहभाग होता. मात्र आता सगळीकडे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट या सुंदर जोडप्याचीच चर्चा होताना दिसत आहे.
‘मन उडू उडू झालं’ मधील इंद्रा अडकला लग्नबंधनात! सोशल मीडियावरून दिली माहिती
त्याचबरोबर अनंत अंबानींच्या वजनाबाबत देखील सोशल मीडियावर अनेक चर्चा होत आहेत. याबाबत मिम्स देखील व्हायरल होत आहेत. २०१६ साली अनंत अंबानी यांनी १०८ किलो वजन कमी केले होते आता त्यांचे वजन पुन्हा वाढले आहे. एवढं वजन कस वाढलं असा प्रश्न लोकांना पडला आहे.
दरम्यान, एका मुलाखतीमध्ये नीता अंबानी यांनी अनंतच्या लठ्ठपणाबद्दलही माहिती दिली आहे. नीता अंबानी (Nita Ambani) यांनी सांगितले की, अनंतला दम्यामुळे स्टेरॉईड्स घ्यावे लागतात. त्यामुळे त्याला लठ्ठपणाचा त्रास होतोय.