बॉलीवूड अभिनेता गोविंदाने एकेकाळी आपल्या अभिनयाने आणि नृत्यामुळे बॉलीवूड इंडस्ट्रीवर राज्य केले होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक सर्वोत्तम चित्रपट केले आहे. इलाजम या चित्रपटातून १९८६ साली त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर गोविंदा यांना १२ फिल्मफेअर पुरस्कारांसाठी नामांकित करण्यात आले. त्या काळात चित्रपट सृष्टी सुपरस्टार म्हटल्या जाणाऱ्या गोविंदाला अमरीश पुरींने लगावली होती कानशिलात.
“… हा आपल्या देशात गुन्हा ठरलाय”, राहुल गांधींची खासदारकी जाताच उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
विशेष म्हणजे फार कमी कालावधीत गोविंदाने इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केली. इतकेच नाही तर एक वेळ अशीही आली जेव्हा गोविंदाकडे इतके चित्रपट आले की त्याला ना स्वतःसाठी वेळ मिळाला ना त्याच्या कुटुंबासाठी. अशा परिस्थितीत तो सतत चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असायचा आणि कधी-कधी एका चित्रपटाच्या सेटवरून दुसऱ्या चित्रपटाच्या सेटवर पोहोचायला उशीर व्हायचा. याच कारणामुळे फक्त को-स्टारच नाही तर दिग्दर्शकालाही अभिनेता गोविंदाचा खूप राग यायचा.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होताच अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
जेव्हा बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि अमरीश पुरी एकत्र एका चित्रपटाचे शूटिंग करत होते. यादरम्यान अमरीश पुरी यांना ९ वाजता सेटवर हजर राहण्यास सांगितले होते. त्यावेळी अभिनेता अमरीश पुरी वेळेवर चित्रपटाच्या सेटवर पोहोचले आणि तयार झाले. पण गोविंदा त्याच्या इतर प्रोजेक्ट्समुळे सकाळी ९ ऐवजी संध्याकाळी ६ वाजता सेटवर पोहोचला. यामुळे अमरीश पुरी इतका संतापला की गोविंदाने चित्रपटाच्या सेटवर पाय ठेवताच अमरीश पुरी त्याच्या कानाखाली वाजवली. दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. या दोघांच्या या भांडणानंतर बॉलिवूडमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती.