
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या हुशारी, चातुर्य व मुत्सद्देगिरी साठी प्रसिद्ध आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांचं एक वेगळंच रूप पहायला मिळालं. राजकीय डावपेच खेळून राज्याची सत्तासमीकरणे बदलणारे देवेंद्र फडणवीस चक्क स्टेजवरच भावनिक होऊन रडताना पहायला मिळाले.
पतंगामागे धावणाऱ्या बालकाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू; ऐन सणात काळाने घातला घाला
भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना लक्ष्मण जगताप यांच्या आठवणींनी देवेंद्र फडणवीस यांना भरून आले व चक्क स्टेजवरच त्यांच्या डोळ्यात पाणी आले.
विधानपरिषद व राज्यसभा निवडणूकांवेळी लक्ष्मण जगताप मतदानासाठी उपस्थित होते. याची खास आठवण देवेंद्र फडणवीस ( Devedra Fadanvis) यांनी यावेळी सांगितली. तब्येत खराब असताना देखील लक्षण जगताप त्यावेळी पीपीई किट घालून लाईफ सेव्हिंग ऍम्ब्युलंन्स मधून मतदानासाठी आले होते.
सचिन तेंडुलकरने बनवले तिळगुळ; व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिल्या अनोख्या शुभेच्छा
इतकंच नाही तर, पीपीई किट घालून ऍम्ब्युलंन्स मधून चाचपडत उतरणारे लक्ष्मण जगताप ( Laxman Jagtap) त्यावेळी फडणवीसांना म्हणाले होते की, “मुख्यमंत्रीसाहेब तुमच्याकरता आलो.” ही आठवण सांगताना फडणवीस भावनिक झाले होते.
विधानपरिषदेवेळी देखील लक्ष्मण जगताप यांना येऊ नका असा निरोप देण्यात आला होता. परंतु, तरीदेखील ते “काहीही झालं तरी मी येणार” असे म्हणत मतदानासाठी आले होते. असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. याशिवाय त्यांनी आणखी बऱ्याच आठवणींना उजाळा दिला.
भारत-श्रीलंका वन डे सामन्यामध्ये किंग कोहलीचा ‘विराट’ शो; ठोकले ७४ वे आंतरराष्ट्रीय शतक