आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या मदतीला धावले; अर्थसंकल्पीय अधिवेशनात घडला हा किस्सा

राज्यात कालपासून विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ( Maharashtra budget session 2023) सुरुवात झाली आहे. आज या अधिवेशनाचा दुसरा दिवस असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधक आक्रमक झालेले पहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर डोक्यावर कांद्याची टोपली घेऊन विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजीही झाली. दरम्यान आज विधानसभेत राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कंद्याच्या भावावरून सरकारला धारेवर धरले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून अजित पवार विधानसभेत कडाडले; म्हणाले…

शिंदे- फडणवीस सरकार शेतकऱ्यांसाठी उपाययोजना करत नाहीत असा आरोप छगन भुजबळ यांनी यावेळी केला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) म्हणाले की, ” हे सरकार शेतकऱ्यांचे आहे. आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करू.” मात्र बोलत असतानाच विरोधकांनी गोंधळ सुरू केला. अध्यक्ष सर्वांना शांत राहण्याचे आवाहन करून देखील विरोधी आमदार मुख्यमंत्र्यांना बोलू देत न्हवते.

आईच्या मृत्यूनंतर नरेंद्र मोदींना आणखी एक मोठा धक्का; कुटुंबातील ‘या’ व्यक्तीची प्रकृती गंभीर

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra Fadanvis) उठून सर्वांना ऐकून घेण्याचे आवाहन केले. परंतु तरी देखील आक्रमक झालेले विरोधक ऐकून घ्यायला तयार न्हवते. यावेळी संतप्त होऊन फडणवीस म्हणाले की, ” सरकारच्या कांदा धोरणाबद्दल तुम्हाला माहीत असेल तर तुम्हीच बोला, आम्ही बसतो. यापूर्वीच मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांच्या मदती संदर्भात आश्वासन दिले आहे.” दरम्यान मुख्यमंत्र्यांना विरोधकांनी घेरताच देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीला आले. याचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

एमसी स्टॅन लवकरच लग्नबंधनात अडकणार? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *