अन् आजी लागल्या रडू! संदीप पाठकचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

And grandmother began to cry! Sandeep Pathak's 'To' video in discussion

अभिनेता संदीप पाठक सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. आपल्या विनोदी अभिनयाने लोकांना हसवून व विविध सामाजिक मुद्द्यांवर दिलखुलास मत मांडून त्याने लोकांच्या मनात स्थान मिळवले आहे. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात.

“तुम्हाला उपवास करूनही चांगली बायको मिळणार नाही” – गोपीचंद पडळकर

दरम्यान सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या सध्या झालेल्या एका व्हिडिओमुळे संदीप पाठक चर्चेत आला आहे. या व्हिडीओ मध्ये तो एका वृद्ध आजींना ( Old Lady) मदत करताना दिसत आहे. प्रवासामध्ये अचानक भेटलेल्या आजींना संदीपने ( Sandip Pathak) मदत केली आहे.

“कोण बागेश्वर बाबा? संत तुकाराम महाराजांबद्दलच्या आक्षेपार्ह विधानावर अजित पवार आक्रमक

अभिनेता संदीप पाठक शूटिंगला निघाला असता रस्त्यात त्याला एक आजी भेटल्या. या आजींना गावाला जायचे होते. मात्र बस चुकल्याने त्या रस्त्यात उभ्या होत्या. यावेळी संदीपने आजींना स्वतःच्या गाडीत लिफ्ट दिली आणि त्यांना त्यांच्या गावी सोडले.

व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्यासाठी ‘ही’ आहेत सर्वात बेस्ट ठिकाणे

या प्रवासादरम्यान त्याने आजींशी भरपूर गप्पा मारल्या आहेत. त्यांची चौकशी करून त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न संदीपने केला. यावेळी आजींनी देखील संदीपला प्रेमाने शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच चांगले आशीर्वाद सुद्धा दिले आहेत. संदीपच्या या छोट्याशा मदतीने आजींच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले होते. या पार्श्वभूमीवर संदीपचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

दोन विद्यार्थिनींनी मिळून केली ऐकिला बेदम मारहाण; पाहा व्हायरल VIDEO

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *