राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड त्यांच्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात. जितेंद्र आव्हाड सत्ताधाऱ्यांवर कायम टीका करत असतात. दरम्यान जितेंद्र आव्हाडांसोबत एक छोटीशी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
“तुम्ही फडणवीस साहेबांना शोभत नाही मॅडम”, ‘त्या’ फोटोवरून अमृता फडणवीस पुन्हा ट्रोल
सध्या सोशल मियद्यावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जितेंद्र आव्हाड मुंब्य्रामध्ये एका कार्यक्रमात स्टेजवर पोहोचले असता अचानक स्टेजचा एक भाग कोसळला, त्यामुळे आव्हाड हे खाली पडता पडता वाचतात.सुदैवाने यामध्ये त्यांना कोणतीही दुखापत होत नाही.
खळबळजनक घटना! डॉक्टर-नर्स उपस्थित नसल्याने आरोग्य केंद्रात आईनेच केली मुलीची प्रसूती
मुंब्रामध्ये आमदार प्रीमियर लीगच्या क्रिकेट सामन्याला जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. यावेळी ही घटना घडली आहे. यावेळी आव्हाड कार्यकर्त्यांसह स्टेजवर पोहोचले त्यावेळी स्टेजवरील खुर्ची जवळ पोहोचले अन् खुर्चीवर बसणार तेच स्टेजचा एक भाग खचला. मात्र कार्यकर्त्यांनी लेगच आव्हाडांना बाजूला घेतले. त्यामुळे अनर्थ टळला आणि आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
होळीच्या दिवशी शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल; कांदा पेटवून केली होळी साजरी