अन् क्षणातच कोसळली ५ मजली इमारत; पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ

And the 5-storey building collapsed in a moment; Watch the shocking video

सध्या दिल्लीमधून (Delhi) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जशी पत्त्यांची इमारत कोसळते तशीच एक इमारत दिल्लीमध्ये क्षणातच कोसळली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिल्लीच्या भाजनपुरा परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

धक्कादायक! कुस्तीचा सराव करताना पैलवानाचा हार्ट अटॅकने मृत्यू

सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून संपूर्ण घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे. हा व्हिडीओ ९ सेकंदाचा असून इमारत जमीनदोस्त होताना यामध्ये दिसत आहे. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार ही इमारत कोसळताच बचावकार्य देखील सुरु होत. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एएनआयने इमारत कोसळतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

शाहरुखच्या घरामध्ये भिंत तोडून घुसलेल्या ‘त्या’ दोन तरुणांबाबत पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

ही इमारत नेमकी कोणत्या कारणाने कोसळली आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. या इमारतीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र त्या इमारतीच्या शेजारच्या दुकानांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्या ठिकाणचा रस्ता बंद करण्यात आलाअसून मलबा हटवला जात आहे.

शरद पवारांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा; म्हणाले, “माझ्या जन्माच्या तिसऱ्या दिवशी…”

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *