राज्यात अवकाळी पाऊसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ( Heavy Rainfall) अवकाळी पावसात फक्त शेतीच नाही तर लोकांचे संसार सुद्धा उध्वस्त झाले आहेत. वाऱ्याचा प्रचंड वेग, जोरदार पडणारा पाऊस त्यात गारांची साथ यामुळे लोकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. मध्यंतरी झालेल्या वादळी पावसात 11 लोकांचा मृत्यु झाला होता तर शेकडो प्राणी मृत्युमुखी पडले होते. ( Unseasonable Rain)
Gautami Patil । गौतमीचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या मुलाचे वय पाहून पोलिसांनाही बसला धक्का!
दरम्यान परभणी (Parbhani) जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसात एका लहान बाळाचा मृत्यु झाला आहे. वादळी पावसात आई वडिलांच्या डोळ्यासमोर या लहान मुलाने जीव सोडला आहे. मागच्या दोन ती दिवसापूर्वी परभणी मध्ये प्रचंड वादळ वाऱ्यासह पाऊस झाला. (Stromes) यामध्ये अनेकांच्या घरावरील पत्रे उडून लोकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. अशातच वादळी वाऱ्यांमुळे घरातील लाकूड अंगावर पडून एका शेतमजुराच्या सहा वर्षाच्या बाळाचा जीव गेला आहे.
‘या’ शेतकऱ्यांना मिळाले विहिरीसाठी लाखोंचे अनुदान; यादी झाली जाहीर
या चिमुकल्या मुलाचे नाव गौरव सुनील रनखांबे असे आहे. कामानिमित्त रनखांबे कुटुंब चुडावा येथे राहत होते. २ तारखेला ही घटना घडली. आईवडिलांच्या डोळ्यासमोर त्या लहान मुलाच्या अंगावर लाकूड पडले आणि त्याचा मृत्यु ( Death of small child) झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून परभणी जिल्ह्यात इतर ठिकाणी सुद्धा जीवितहानी झाली आहे.
मोठी बातमी! गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक