
ऐन सुगीचे दिवस त्यात अचानक आलेला अवकाळी पाऊस यामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडले आहेत. अवकाळी पाऊसात झालेल्या गारपिटीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी तर पिके अक्षरशः पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. एकामागोमाग येणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे ( Natural calamities) शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान तर होतच आहे. मात्र सोबतच शेतजमिनीची देखील नासधूस होत आहे. यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढावले आहे. दरम्यान कृषिमंत्री अब्दुल सत्तार ( Abdul Sattar) यांनी बुलढाण्यात शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. ( Buldhana)
गौतमी पाटीलच्या मदतीसाठी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांचा पुढाकार; म्हणाल्या, “गरीब घरातून…”
यावेळी एका शेतकऱ्याचे अश्रू अनावर झाले आणि तो शेतकरी कृषीमंत्र्यांसमोर ढसाढसा रडला. या शेतकऱ्याचे रडणे कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले असून तो व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून कोणाचेही डोळे पाणावतील एवढे शेतकरी हतबल झाले आहेत.
सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी
या रडणाऱ्या शेतकऱ्याला सावरण्याचा कृषिमंत्री प्रयत्न करत होते. मात्र शेतकरी एवढा ओक्साबोक्शी रडत होता की कृषिमंत्र्यांना देखील त्याला सावरणे अवघड झाले. रडत रडतच या शेतकऱ्याने आपल्या शेतीच्या नुकसानीची माहिती अब्दुल सत्तार यांना दिली आहे. दरम्यान ही परिस्थिती पाहून कृषिमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
प्रवासादरम्यान उलट्या किंवा मळमळ होत असेल तर ‘हे’ उपाय नक्की आजमावून बघा