सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ आता व्हायरल ( Viral video) होतोय. ज्यामध्ये एक वयोवृद्ध शेतकरी चक्क इंग्रजी मध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यासोबत बोलत आहे. या व्हिडीओ मध्ये शेतकरी आजोबा (Old Farmer) आपल्या अडचणींचा पाढा अधिकाऱ्यासमोर वाचत आहेत.
शिवसेना आक्रमक! राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विरोधात जेलभरो आंदोलन
व्हायरल झालेला हा व्हिडिओ सांगली मधील आटपाडी तालुक्यातील आहे. सध्या महावितरणचे पथक वीजचोरी रोखण्यासाठी काम करत आहे. अशातच एक पथक आटपाडी मधील वाडी गावात दाखल झाले, तेव्हा एका शेतकरी आजोबांनी कृषिपंपासाठी वीजेची चोरी केल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी आजोबांना जाब विचारण्यास सुरुवात केली.
“मी तुम्हाला करते मुजरा”, गौतमी पाटीलच नवीन गाणं रिलीज होताच नेटकऱ्यांनी घेतलं डोक्यावर!
दरम्यान, आजोबांनी देखील न डगमगता इंग्रजी (English) मधून आपली बाजू मांडली. यावेळी त्यांनी वीज कनेक्शन साठी कोणत्या अडचणी येतायत याची माहिती अधिकाऱ्यांना दिली. अधिकाऱ्यांनी देखील शांतपणे आजोबांचे बोलणे ऐकून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये आजोबा काही वाक्यांत मराठी शब्द वापरत आहेत. त्यामुळे व्हिडीओ पाहणाऱ्याला हसू येत आहे.