गोठ्यातील जनावर हे शेतकऱ्यांसाठी जीव की प्राण असते. मात्र बऱ्याचदा आपण पाहतो की जनावरांना देखील आपल्या मालकावर फार जीव असतो. दरम्यान कोल्हापूर (Kolhapur) येथे मालक व बैलांच्या जोडीसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतीची कामे आवरून घरी जात असताना कालव्यातील पाण्यात पडून बैलजोडीचा मृत्यु झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ( Bulls Accident)
कागल (Kagal) तालुक्यातील वाळवे खुर्द येथील शेतकरी दिलीप खुटाळे या शेतकऱ्याच्या बैलासोबत ही घटना घडली आहे. शेतातील मशागतीची कामे आटोपून दिलीप खुटाळे बैलगाडीने घराकडे परतत होते. यावेळी कालव्याच्या काठावर आल्याने अचानकपणे बैल घाबरले. यामुळे बैलगाडीवरचा ताबा सुटून बैलगाडी कालव्याच्या पाण्यात पडली.
सुप्रिया सुळे मुंबईकरांना म्हणाल्या, “नुसतं घड्याळ बघू नका, तर घड्याळाचं…”
या बैलांना सापती होत्या, त्यामुळे त्यांना पाण्यात कोणत्याही प्रकारची हालचाल करण्यात आली नाही. दरम्यान पाण्यात बुडून दोन्ही बैलांचा दुर्दैवी मृत्यु झाला. बैलांच्या मालकाने प्रयत्न करून पाण्याच्या बाहेर पडल्यानंतर आजूबाजूच्या लोकांना मदतीला बोलावले. मात्र तोपर्यंत बैलांनी जीव सोडला होता. हे पाहून शेतकऱ्याला आपले अश्रू अनावर झाले आणि तो तिथंच रडू लागला. यामध्ये दिलीप यांचे दोन लाखांचे नुकसान झाले आहे.
सलमान खान याच्याबद्दल ‘ही’ गोष्ट ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!