Site icon e लोकहित | Marathi News

अन् शेतकऱ्यांनी चक्क टोमॅटो फेकून दिले; कवडीमोल दरामुळे उत्पादक वर्ग चिंतेत!

प्रत्येक हंगामात शेतकरी चांगल्या दराची अपेक्षा ठेऊन असतो. मात्र शेवटी त्याच्या पदरी निराशाच येते. यंदाच्या वर्षी कापूस, तूर, सोयाबीन व कांदा या महत्त्वाच्या नगदी पिकांनी शेतकऱ्यांच्या अपेक्षांना तोंडावर आपटले आहे. अशातच प्रमुख आंतरपीक ( Internal crop) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टोमॅटोने देखील दराच्या बाबतीत पाठ फिरवली आहे.

शेतकरी राजा चिंतेत! राज्यात आजपासून अवकाळी पाऊस; ‘या’ ठिकाणी होणार गारपीठ

पिकाला चांगला दर मिळत नाही म्हणून कांदा, फुलकोबी असणाऱ्या शेतात रोटर फिरवण्याच्या घटना खूप ठिकाणी घडल्या आहेत. दरम्यान आता टोमॅटोला ( Tomato) देखील दर नाही म्हणून टोमॅटोचे पीक भुईसपाट करण्याच्या तयारीत शेतकरी आहेत.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला धडाकेबाज निर्णय; वाचा सविस्तर

टोमॅटोला अवघा एक रुपया दर मिळत असल्याने काही शेतकऱ्यांनी याआधी चक्क रस्त्यावर टोमॅटो फेकून निषेध व्यक्त केला होता. सध्या धामणगाव धाड गावातील शेतकऱ्यांनी तर बाजारपेठेत दहा रुपये कॅरेट दराने टोमॅटोची होणारी मागणी पाहून टोमॅटो फेकून देणे पसंत केले.

धक्कादायक! कोपर्डीतील ५ वर्षीय चिमुकल्याचा बोअरवेलमध्ये पडून दुर्दैव मृत्यू

मोठ्या अपेक्षेने हे शेतकरी आठवडी बाजारात टोमॅटो विक्रीसाठी घेऊन आले होते. मात्र टोमॅटोला मिळणारा तोकडा दर पाहून त्यांची देखील चांगलीच निराशा झाली आहे. फक्त येथेच नाही तर पिंपळगाव रेणुकाई येथे देखील टोमॅटोला भाव मिळत नाही, हे लक्षात येताच शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकून दिले आहेत.

सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर जाणार; 19 लाख कर्मचाऱ्यांचा असणार सहभाग

Spread the love
Exit mobile version