आजकाल आपण कमी वेळात सहज वाहने उपलब्ध व्हावीत यासाठी ओला, उबर बुक करतो. ( ola, uber) आजकाल तर रॅपिडो ( Rapido) देखील बुक केली जाते. दरम्यान बंगळुरूमध्ये ( Bangluru) रॅपिडो वरून जाणाऱ्या महिलेसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही घटना घडल्यानंतर महिलेने कोणताही विचार न करता थेट गाडीवरून उडी मारली आहे. (Rapido driver molest’s Woman)
माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अडचणीत! अमेरिकन लेखिकेने केला लैंगिक शोषणाचा आरोप
त्याच झालं असं होतं की, पीडित महिलेने इंदिरानगरला जाण्यासाठी रॅपिडो बुक केली होती. रॅपिडो ड्रायव्हरने या महिलेला ११ वाजून १० मिनिटांनी पीक केले होते. यावेळी या ड्रायव्हरने ओटीपी चेक करण्याच्या बहाण्याने महिलेचा फोन हातात घेतला. त्यानंतर त्याने विमानतळाच्या दिशेने बाईक घेतली. दरम्यान ड्रायव्हरने पीडित महिलेला पकडण्याचा व स्पर्श करण्याचा प्रयत्न केला.
शरद पवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरून चर्चा; राजकीय घडामोडींना वेग
यावेळी महिलेने ड्रायव्हरला विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ड्रायव्हरने तिचे काहीच ऐकले नाही. शेवटचा प्रयत्न म्हणून त्या महिलेने स्वतःला वाचवण्यासाठी धावत्या गाडीवरून उडी मारली. दरम्यान पोलीस म्हणाले की, आमच्या विभागात घडलेला हा पहिला गुन्हा असून या पार्श्वभूमीवर आम्ही लवकरच उपाययोजना करणार आहोत. आरोपी ड्रायव्हर विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदविला गेला आहे.
Rohit Sharma : रोहित शर्माने आयपीएलमधून ब्रेक घ्यावा! ‘या’ माजी दिग्गज फलंदाजाचा सल्ला