सेलेब्रिटी लोकांचे वाढदिवस त्यांच्या चाहत्यांसाठी सोहळ्यासारखे असतात. या दिवशी चाहते आपल्या आवडत्या सेलेब्रिटींवर शुभेच्छाचा वर्षाव करतात. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर हीचा काल वाढदिवस झाला यानिमित्ताने चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. काल श्रद्धा कपूर ( Shraddha Kapur’s Birthday) हीचा 36 वा वाढदिवस झाला. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात काही खास गोष्टी!
पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर साधला निशाणा; म्हणाल्या, “चारित्र्यहीन व्यक्ती राजकारणातील व्हिलन…”
श्रद्धा कपूर ही हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय खलनायक आणि विनोदी अभिनेते शक्ती कपूर व शिवांगी कोल्हापूरे यांची कन्या आहे. तिचा जन्म 3 मार्च 1987 ला झाला. वयाच्या 24 व्या वर्षी श्रद्धाने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. श्रद्धा फक्त अभिनय क्षेत्रातच नाही तर गायन क्षेत्रात सुद्धा आघाडीवर आहे.
नागराज मंजुळेंच्या अजून एका नवीन गाण्याने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ; पाहा VIDEO
आजपर्यंत तिने अनेक सिनेमांमध्ये गाणी गायली आहेत. ‘आशिकी 2’, ‘साहो’, ‘एक विलेन’, ‘छिछोरे’ व ‘बागी’ या प्रचंड लोकप्रिय सिनेमांत श्रद्धाने गाणी गायली आहेत. लोकप्रियतेच्या बाबतीत श्रद्धाने तिच्या वडिलांना देखील मागे टाकले असून 2015 मध्ये फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटी 100 या यादीमध्ये श्रद्धा कपूरचा समावेश झाला होता.
हृतिक रोशन लवकरच अडकणार विवाहबंधनात? लग्नानंतर राहण्यासाठी घेतले नवीन घर
श्रद्धा आज लोकप्रिय अभिनेत्री असली तरी एकेकाळी तिने सिनेमात काम करणे नाकारले होते. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षीच श्रद्धा ला सलमान खानच्या ( Salman Khan) एका सिनेमात काम करण्याची संधी उडवून टाकली होती. आपल्याला सायकोलॉजिस्ट व्हायचे असल्याचे तिने यावेळी सांगितले होते.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात फडणवीसांच नाव; चर्चांना उधाण