महाराष्ट्रात गौतमी पाटीलला ओळखत नाही, असे कोणी शोधूनही सापडणार नाही. मागच्या काही दिवसांत लावणी कलाकार म्हणून गौतमी पाटील प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. दरम्यान लावणीमध्ये अश्लील हालचाली करत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात केला जात होता. मात्र तरी देखील गौतमीचे लावणीचे कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात होत आहेत.
देशातील साखर उत्पादनात वाढ; साखरेच्या दरात होऊ शकते घसरण
गौतमीच्या (Gautami Patil) नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात गोंधळ झाला होता. यावेळी चक्क गावातील महिला आक्रमक झाल्या. खेड ( Khed) तालुक्यातील बहिरवाडी येथे गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम होता. यावेळी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद देत जल्लोष केला. परंतु, गावातील काही तरुणांनी कार्यक्रमामध्येच धुडगूस घातला. यामुळे कार्यक्रम बंद करण्याची वेळ आली.
इंस्टाग्राम रिल्स मधून ‘असे’ कमवा पैसे! फक्त व्हिडीओ बनवून व्हाल मालामाल
यावेळी गावातील महिला आक्रमक झाल्या आणि त्यांनी हातात काठी घेत तरुणांना दम देण्यास सुरुवात केली. तरुणांच्या गर्दीत घुसून त्यांच्यावर काठी उगारत शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न यावेळी महिलांनी केला. या घटनेमुळे गौतमी पाटील चांगलीच चर्चेत आली आहे.