Andhra Pradesh Train Accident । आंध्र प्रदेश या ठिकाणी रेल्वेचा मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. आंध्रप्रदेश मधील विजयानगर मध्ये दोन गाड्यांमध्ये भीषण टक्कर झाली आहे. रविवारी हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 25 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या लोकांपैकी काही जणांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर मृतांचा आकडा वाढण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.
Eknath Shinde । एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का! मराठा आरक्षणासाठी खासदारांनी दिला राजीनामा
एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली असून या अपघाताचे काही फोटो देखील ट्विटरवर शेअर करण्यात आले आहेत. या फोटोमध्ये घटनास्थळी अनेक लोक उपस्थित असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर काही डबे रुळावरून घसरल्याचे देखील दिसत आहे. (Andhra Pradesh Train Accident)
Ajit Pawar Dengue । मोठी बातमी! अजित पवार यांना डेंग्यूची लागण
दरम्यान, या घटनेवर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगमोहन रेड्डी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर जखमी झालेल्या लोकांना दवाखान्यात नेण्यासाठी पुरेशा रुग्णवाहिन्यांची व्यवस्था करण्याचे आदेश देखील दिले.
Manoj Jarange । सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली
Andhra Pradesh | A passenger train which was going to Rayagada from Visakhapatnam derailed in Vizianagaram district. More details awaited: Divisional Railway Manager
— ANI (@ANI) October 29, 2023
(Pictures taken by locals shared with ANI) pic.twitter.com/ZcynNnoJye