Site icon e लोकहित | Marathi News

राज्यात लवकरच अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

Anganwadi employees will be recruited in the state soon; Chief Minister Eknath Shinde's big announcement

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून मागील काही दिवसांमध्ये विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. यावेळी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20 हजारांपेक्षा अधिक पदांच्या भरतीला मान्यता मिळाली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे लवकरच ही भरती सुरू करण्यात येणार आहे.

“यांना गुंतवणुकीपेक्षा पंतप्रधानांचे राजकीय कार्यक्रम महत्त्वाचे आहेत”; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसह नवीन मोबाईल, विमा, अंगणवाड्यांसाठी वर्ग आदी विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. याशिवाय ‘वर्षा’ येथे झालेल्या या बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे ( Meeting Regarding Anganwadi Workers) निवृत्ती वेतन, पोषण आहारात करण्यात येणारी दरवाढ, पोषण ट्रॅकर, मानधनवाढ, रिक्त पदे या विषयांवर चर्चा करण्यात आली.

उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं! शिवसेना पक्षप्रमुखपदाची मुदत संपणार

बैठकीमधील महत्त्वाचे निर्णय

1) अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20 हजार 186 पदांच्या भरतीला मान्यता.
2) अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या एकरकमी लाभ योजनेमधील प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा करण्याचे आदेश.
3) पोषण आहाराच्या दरात वाढ होणार
4) महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये हे अंगणवाडी वर्ग भरविण्याच्या सूचना
5) अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता मिळणार

महाराष्ट्रातील ‘या’ गावात शेतीला बांधच नाहीत; सगळीकडे रंगलीय जोरदार चर्चा

Spread the love
Exit mobile version