Site icon e लोकहित | Marathi News

Anil Babar Passed Away । दुःखद! शिंदे गटाचे पाणीदार आमदार अनिल बाबर यांचं आकस्मिक निधन

Anil Babar Passed Away

Anil Babar Passed Away । शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांचं आज निधन झालं आहे. ते 74 वर्षांचे होते. ते सांगली जिल्ह्यातील खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातून (Khanapur-Atpadi Assembly Constituency) आमदार होते. न्यूमोनिया झाल्याने त्यांना काल दुपारी सांगलीतील रुग्णालयात दाखल केलं होतं. पण आज पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. (Latest marathi news)

Manvendra Singh Accident । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! काँग्रेसच्या माजी खासदाराच्या कारला भीषण अपघात

दरम्यान, त्यांनी सरपंच पदापासून राजकारणातील अनेक पदे भूषवली असून जिल्हा परिषद सदस्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. मागीलवर्षी झालेल्या राजकीय उलथापालथीत ते अचानक नॉट रिचेबल झाले आणि शिंदे गटात ते सहभागी झाले होते. त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे विश्वासू आमदार अशी ओळख होती. (Anil Babar death)

Mexico Accident । भीषण रस्ता अपघात, प्रवाशांनी भरलेली बस उलटली, 18 जागीच ठार तर 29 जखमी

बाबर यांची पश्चिम महाराष्ट्रात पाणीदार आमदार अशी ओळख असून ते खानापूर-आटपाडी या मतदारसंघासाठी जायकवाडी प्रकल्पातून पाणी खेचून आणता येईल, यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिले. त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षाकडून यासाठी प्रयत्न केले. या योजनेला त्यांनी टेंभू योजना असे नाव दिले. आज त्यांच्या जाण्याने राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Jarange Patil । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! 10 फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण; जरांगे पाटील यांची सर्वात मोठी घोषणा

Spread the love
Exit mobile version