Anil Deshmukh । महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. काटोल विधानसभा मतदारसंघातील त्यांच्या चिरंजीवांच्या प्रचारसभेनंतर घरी परतत असताना अनिल देशमुख यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. हा हल्ला काटोल शहराच्या बाहेर असलेल्या जलालखेडा मार्गावर बेलफाट्याजवळ झाला. गाडीच्या काचा फुटल्यामुळे अनिल देशमुख यांना गंभीर जखम झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांना कळवण्यात आले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी अज्ञात आरोपींचा शोध सुरु केला आहे. दगडफेक करण्यात आलेल्या गाडीची काच फुटून थेट अनिल देशमुख यांच्या डोक्याला लागली. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून त्यांच्यावर तात्काळ काटोल येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Ajit Pawar । “विधानसभेला गंमत करु नका, नाहीतर…”; अजित पवार यांचे मोठे वक्तव्य
याच दरम्यान, घटनास्थळी एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये अनिल देशमुख जखमी अवस्थेत गाडीत बसलेले दिसत आहेत. त्यांचे डोकं फुटल्यामुळे रक्त येत असून, त्यांनी तात्पुरते रुमाल बांधलेला आहे. आणि तातडीने रुग्णालयात घेऊन जात असताना एकच गोंधळ उडालेला दिसत आहे.
Hospital Fire । भयानक! हॉस्पिटलध्ये लहान मुलांच्या वॉर्डला भीषण आग, 10 बालकांचा मृत्यू
हा हल्ला कोणत्या कारणाने आणि कोणत्या हेतूने करण्यात आला याबाबत सध्या तपास सुरू आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधकांसह अनेक राजकीय पक्षांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. काही नेत्यांनी या घटनेचा कायदेशीर तपास करून आरोपींना कडक शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे.
Devendr Fadanvis । सर्वात मोठी बातमी! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला मोठा गौप्यस्फोट