
Ranbir Kapoor । एक डिसेंबर रोजी अभिनेता रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ (Animal) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटात बॉबी देओल (Bobby Deol), अभिनेत्री रश्मिका मंदानासह (Rashmika Mandana) अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला होता. प्रदर्शित झाल्यापासून आतापर्यंत चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. पहिल्या दिवसापासून चित्रपटाने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. (Latest Marathi News)
Accident News । ओव्हरटेक करणं आलं अंगलट, एका चुकीमुळे क्षणात संपूर्ण कुटुंबच संपलं
500 कोटी रुपयांचा टप्पा पार
आणखी एक विक्रम ॲनिमल’ने स्वतःच्या नावावर केला आहे. कमाईच्या बाबतीत आता चित्रपटाने पठाण (Pathan), गदरला मागे टाकले आहे. ॲनिमलने 512 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रणबीर कपूरचा 500 कोटी रुपयांचा टप्पा गाठणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे. सर्वात वेगवान कमाई करणारा बॉलिवूडमधला दुसरा चित्रपट ठरला आहे. (Animal box office collection)
Tamil Nadu Rain । तामिळनाडूत पावसाचा धुमाकूळ; शाळा-कॉलेज बंद, गाड्याही रद्द
संदीप वांगा रेड्डीचं (Sandeep Vanga Reddy) दिग्दर्शन असणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. रणबीर कपूर आणि तृत्पी डिमरीच्या इंटिमेट सीन आणि काही डायलॉगमुळे या चित्रपटाला ट्रोल केले होते. परंतु, चित्रपटाच्या कमाईवर त्याचा काहीच फरक झाला नाही. दिवसेंदिवस या चित्रपटाची क्रेझ वाढतच चालली आहे. हा चित्रपट आणखी कमाई करू शकतो.
Big accident in Sinhagad Ghat । सिंहगड घाटात मोठी दुर्घटना! 12 पर्यटकांना घेऊन जाणारी जीप उलटली
दरम्यान, या चित्रपटातील गाणी, डायलॉग आणि काही सीन्स सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. 1 डिसेंबरला प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. आता या चित्रपटाचे बॉक्स ऑफिसचे आकडे समोर आले आहेत.