
मागच्या काही दिवसापासून राज्यात लम्पी (Lumpy) स्कीन या आजाराने धुमाकूळ घातला आहे. या आजारामुळे अनेक जनावरे दगावली आहेत. यामुळे पशुपालकांना याचा चांगलाच फटका बसला आहे. लम्पी आजार जास्त प्रमाणात वाढ असल्यामुळे मागच्या दोन ते अडीच महिन्यांपासून जनावरांचे बाजार बंद आहेत. सध्या लम्पी स्कीन हा आजार आटोक्यात येत असल्यामुळे जनावरांचे बाजार येत्या चार दिवसात सुरु होणार आहेत.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत एकाचा मृत्यू; वाचा सविस्तर माहिती
बऱ्याच जनावरांचे लसीकरण झाले आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर बाजाराला परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बाबतचे परिपत्रक काढण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने विधी व न्याय विभागाला देखील पाठवले आहेत. आता यावर पुढच्या दोन दिवसांमध्ये निर्णय होणार आहे.
काँग्रेस व ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘हे’ नेते शिंदे गटात प्रवेश करणार
दरम्यान, लम्पी आजारामुळे जनावर दगावल्यामुळे नुकसानभरपाई देखील मिळणार आहे. यामध्ये गायीसाठी ३० हजार, बैलासाठी २५ हजार, तर वासरांसाठी १६ हजार दिले जात आहेत.