Site icon e लोकहित | Marathi News

पशुसेवा कृतज्ञता पुरस्कार सोहळा संपन्न; औरंगाबाद सिटी कॅनन क्लब चे उद्घाटन

Animal Services Appreciation Award Ceremony Concluded; Inauguration of Aurangabad City Cannon Club

औरंगाबाद: मरासिम ग्रुप ऑफ कॅनल आयोजित पशु सेवा कृतज्ञता पुरस्कार सोहळा काल दुपारी एक वाजता संपन्न झाला. शहराच्या मिल कॉर्नर परिसरातील अलंकार हॉटेल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. अनिल भादेकर, श्री मुकुंद जोशी, फारुक शेख आणि जमीर पठाण यांचा मरासिम ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सहलीला जाणे पडले महागात! धबधब्यावरुन कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू

दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते औरंगाबाद सिटी कॅनन क्लब चे देखील उद्घाटन करण्यात आले. पशुसेवेमध्ये योगदान दिलेल्या सत्कारमूर्तींच्या कामाची दखल घेऊन त्यांचा सत्कार करणे आणि कॅनन क्लब ऑफ इंडियाच्या धर्तीवर , औरंगाबाद शहरासाठी ‘औरंगाबाद सिटी कॅनन क्लब’ चे उद्घाटन करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे मरासिन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष क्षितिज सावंत यांनी सांगितले. मरासिम ग्रुप ऑफ कॅनल हा श्वानप्रेमी आणि श्वान ब्रिडरचा ग्रुप असून दोनशे पेक्षा अधिक या ग्रुपची सदस्य संख्या असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी साबेर मिर्झा , श्याम भावले , अश्विन चव्हाण , सुशील बोर्डे, वैभव मोरे, अक्षय डोंगरे , क्षितिज सावंत इत्यादींची उपस्थिती होती.

बारामती माळेगाव कारखान्याचा निर्णय उच्च न्यायालयाने फेटाळला; वाचा सविस्तर

औरंगाबाद सिटी कॅनन क्लब स्थापनेमागचा मुख्य उद्देश

कांद्याचे दर घसरले, खर्चही निघेना; शेतकरी राजा संतप्त

क्षितिज सावंत (संस्थापक अध्यक्ष मरासिन ग्रुप )

“आपल्या शहराची जसजशी लोकसंख्या वाढत आहे तशी श्वान प्रेमींमध्ये वाढ होत असून श्वान ब्रीडर देखील वाढले आहेत. मात्र श्वानांची योग्य पद्धतीने देखरेख आणि संगोपन कसे करावे याविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. श्वान संगोपणाबद्दल योग्य माहिती श्वानप्रेमीपर्यंत पोहोचवणं हे ब्रिडरच काम आहे. ब्रिडर हे श्वानप्रेमी मधले दुवा आहेत. तसेच आपण विकलेल्या पिल्लांचे पुढे काय होते याकडे लक्ष देऊन त्यांचा रेकॉर्ड ब्रिडरने ठेवायला हवा.
८ जानेवारी २०२३ ला आपल्या शहरात श्वान प्रदर्शन घेण्याचं मी ठरवलं आहे. या प्रदर्शनात विविध जातींचे श्वान पाहायला मिळतील. प्रदर्शनाची तयारी अद्याप चालू आहे.”

मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन

” श्वान ब्रीडिंग ही एक कला आहे. कुत्र्याचे पिल्लू विकून श्वान ब्रिडरची जबाबदारी संपत नाही तर श्वानाच्या मालकाला पुढील काळात ब्रिडरने श्वानाच्या संगोपणा बाबतीत सल्ला देऊन नैतिक पाठपुरवठा केला पाहिजे.
पशुस्वास्थ्या विषयी जागरूकता निर्माण करायला पाहिजे. पप्पी मिलर आणि नैतिक ब्रीडिंग यातील फरक लक्षात घेऊन योग्यरीत्या ब्रीडिंग केली पाहिजे.”

(प्रतिनिधी – ज्ञानेश्वर ताले)

थंडीच्या दिवसांत केळी व पपईच्या बागांची अशी काळजी घ्या; अन्यथा होऊ शकते नुकसान

Spread the love
Exit mobile version