भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. परंतु, शेतीतून आर्थिक उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी जोडव्यवसाय करतात. यामध्ये पशुपालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन यांसारख्या व्यवसायांचा समावेश होतो. यासाठी सरकारसुद्धा शेतकऱ्यांना मदत करत असते. सध्या राष्ट्रीय पशुधन योजनेअंतर्गत ( Rashtriy Pashudhan Yojana) गाय, म्हैस, शेळी यांसारख्या दुभत्या जनावरांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या योजनेअंतर्गत दुभत्या जनावरांचा 25 ते 300 रुपयांपर्यंत विमा काढता येऊ शकतो.
“…अन्यथा मला कर्नाटकात यावे लागेल”, संभाजीराजे छत्रपतींचा गंभीर इशारा
बऱ्याचदा गाय, म्हैस, शेळी यांसारख्या जनावरांचा अपघाती मृत्यु होतो. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यासाठी सरकारने दुभत्या जनावरांसाठी विमा उतरवण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जनावरांचा अपघाती मृत्यु झाल्यास सरकारकडून 88,000 रुपयांपर्यंतची भरपाई दिली जाते. केंद्र व राज्य सरकारने ( Central & Stats Government) एकत्रितपणे ही योजना राबविली आहे. लम्पि सारख्या त्वचा आजाराने जनावरांचा मृत्यु होत असताना, सरकारने अशी योजना सुरू केल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे.
राज्यपालांना पदावरून हटवले तरी मोर्चा निघणारचं – अजित पवार
यामध्ये गाय, म्हैस, बैल, झोटा, घोडा, उंट, गाढव, खेचर आणि बैल या जनावरांचा विमा उतरवला जाऊ शकतो. कोणताही शेतकरी किमान 5 जनावरांचा या योजनेअंतर्गत विमा उतरवू शकतो. तसेच एसटी-एससी (SC- ST) पशुपालकांच्या जनावरांसाठी विमा विनामूल्य असणार आहे. दरम्यान विमाधारक जनावराचा अपघाती मृत्यु झाल्यास विम्याची रक्कम दिली जाणार आहे. यामध्ये गाईसाठी 83,000 रुपये, म्हैशीसाठी 88,000 रुपये, मालवाहू जनावरांसाठी 50,000 रुपये व इतर लहान प्राण्यांसाठी 10,000 रुपये अशी विम्याची रक्कम मिळणार आहे.
“येत्या ४८ तासांत हे प्रकरण संपलं नाही तर…”, शरद पवारांचा कर्नाटक सरकारला गंभीर इशारा