Anjali Damania on Ajit Pawar । अंजली दमानिया यांचा अजित पवार गटाला मोठा सवाल; म्हणाल्या, “हे सर्व घोटाळ्याचे पैसे..”

Anjali Damania on Ajit Pawar

Anjali Damania on Ajit Pawar । सध्या आगामी लोकसभा त्याचबरोबर विधानसभा निवडणुका येत आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. पक्ष बांधणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पक्ष उभारणीला सुरुवात केली आहे. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढावे त्याचबरोबर त्यांना प्रचार करता यावा यासाठी अजितदादाdx गटाकडून जिल्हाध्यक्ष आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना एक महागडी गाडी भेट दिली जाणार आहे.

Sharad Pawar । शरद पवार यांना सर्वात मोठा धक्का! गटातील नेत्यावर पोलिसांत ॲट्रॉसिटीचा गुन्हा

आता याच मुद्द्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी एक ट्विट केले आहे. त्यांनी काही प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. “जो पक्ष अजुन पक्ष म्हणून घोषित पण झाला नाही , त्या पक्षाने इतक्या अफाट गाड्या कुठून घेतल्या? पैसा कुठून आला? कोणी देणग्या दिल्या? आता ED / ACB आणि EC ने डोळे मिटून घेतले आहेत का? असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे”.

Chandrakant Patil । धक्कादायक! चंद्रकांत पाटलांच्या ताफ्यासमोर तरुणाचा पेटवून घेण्याचा प्रयत्न, नेमकं प्रकरण काय?

हे सगळे सिंचन घोटाळ्यातले पैसे आहेत? का अजित पवारांनी काबाड कष्ट करून कमावलेले पैसे? कुठून येतात एवढल्या गाड्या ? सामान्य माणसाला एक गडी घेतांना देखील नाके नऊ होते. असं ट्वीट करत अंजली दमानिया सध्या त्यांचे ट्विट चर्चेत असून राजकीय वर्तुळात देखील त्यांच्या ट्विटच्या चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

Ranbir Kapoor । मोठी बातमी! अभिनेता रणबीर कपूरविरुद्ध तक्रार दाखल, नेमकं कारण काय?

Spread the love