
Anju Return From Pakistan । पाकिस्तानी तरुणाच्या प्रेमात पडून भारत सोडून पाकिस्तानला गेलेली अंजू परतली आहे. अंजू बुधवारी वाघा बॉर्डरमार्गे भारतात परतली. सहा महिन्यांपूर्वी ती भारतातून पाकिस्तानात पोहोचली होती, पाकिस्तानात पोहोचल्यानंतर तिने तिचा पाकिस्तानी मित्र नसरुल्लाहशी लग्न केले. (Anju Return From Pakistan)
Weather News । सावधान! पुढील काही तास महत्त्वाचे! देशातील काही राज्यांवर चक्रीवादळाचा धोका निर्माण
34 वर्षीय अंजू जुलैमध्ये तिच्या फेसबुक मित्र नसरुल्लाला भेटण्यासाठी पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा येथे गेली होती. नंतर पाकिस्तानी मीडियाने वृत्त दिले की अंजूने इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर नसरुल्लासोबत लग्न केले होते. यासोबतच अंजूने तिचे नाव बदलून फातिमा ठेवले आहे. अंजूने पाकिस्तानात जाऊन लग्न केल्यानंतर, तिचा पाकिस्तानी पती नसरुल्लाह म्हणाला की अंजू 20 ऑगस्टला भारतात परतेल, जेव्हा तिचा व्हिजा संपेल. मात्र, त्यांच्या लग्नाची बातमी एका दिवसातच समोर आली. ऑगस्टमध्ये पाकिस्तानने अंजूचा व्हिजा एक वर्षासाठी वाढवला होता.
Mumbai Cylinder Blast । मोठी दुर्घटना! मुंबईत सिलेंडरच्या स्फोटामुळे पाच घरांची पडझड, चार जण जखमी
अंजू पाकिस्तानात मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती
सप्टेंबरमध्ये अंजूचा पती नसरुल्ला याने सांगितले की, त्याची पत्नी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे आणि ती आपल्या मुलांना खूप मिस करत आहे. अंजू पुढील महिन्यात भारतात परतणार असल्याचे नसरुल्लाह यांनी सांगितले. नसरुल्लाह यांनी पीटीआयला सांगितले की, फातिमा (अंजू) पुढील महिन्यात भारतात परतत आहे. तिच्याकडे परत जाण्याशिवाय पर्याय नाही.
मुलांच्या आठवणी अंजूला सतावत होत्या
नसरुल्लाह यांने पीटीआय या वृत्तसंस्थेशी फोनवर बोलताना सांगितले की, अंजूचे मानसिक आरोग्य बिघडू नये अशी माझी इच्छा आहे. तो म्हणाला की अंजूने आपल्या मुलांना भेटण्यासाठी तिच्या देशात जाणे चांगले आहे.
Pune News । धक्कादायक! मालवाहू करणाऱ्या ट्रक चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू