
Tomato Subsidy । दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी टोमॅटोची (Tomato) शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. सुरुवातीला टोमॅटोला चांगले दर (Tomato Price) मिळाले होते. त्यामुळे टोमॅटो विक्रीतून शेतकऱ्यांना करोडो रुपयांचा फायदा झाला होता. दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या ताटातून टोमॅटो गायब झाला आहे. परंतु, सध्या टोमॅटोचे दर पुन्हा कोसळले झाले आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. (Latest Marathi News)
Mobile Addiction । धक्कादायक! शहरातील 61 टक्के लहान मुलांना लागलंय मोबाइलचं व्यसन
सरकारने भाजीपाल्यासह सर्व पिकांना हमीभाव जाहीर करावा, टोमॅटोलाही कांद्याप्रमाणे अनुदान (Subsidy) द्यावे, अशी मागणी भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी केली आहे. यावर्षी आवक कमी झाल्याने टोमॅटोचे दर (Tomato Rate) वाढले होते. टोमॅटोची शंभरी पार केली होती. सरकारने नेपाळमधून टोमॅटो आयात (Tomato imports) केला होता. त्यामुळे टोमॅटोसह सर्वच भाजीपाल्यांना हमीभाव द्यायला काहीच हरकत नाही, असे मत भद्रे यांनी व्यक्त केले आहे.
टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना सध्या दोन रुपये ते पाच रुपये किलोने टोमॅटोची विक्री करावी लागत आहे. यातून त्यांना वाहतुकीचा नाहीच परंतु मजुरीचादेखील खर्च निघत नाही. काही शेतकरी तर परवडत नसल्याने शेताच्या बांधावर टोमॅटो फेकून देत आहेत. सरकारने या शेतकऱ्यांना अनुदान देऊन आधार द्यावा, असे भद्रे म्हणाले आहेत. त्यांच्या या मागणीवर सरकार निर्णय घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Sharad Pawar । “शरद पवार कधीही कुणाशी युती करू शकतात”; शिंदे गटाच्या नेत्याचं खळबळजनक विधान