हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने सादर केलेल्या अहवालामुळे गौतम अदानी (Gautam Adani) चांगलेच अडचणीत आले आहेत. ‘अदानी कॉर्पोरेट इतिहासातला सर्वांत मोठा घोटाळा करत आहेत’ असा आरोप या अहवालात करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत अदानी यांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
एका जागेसाठी 21 उमेदवार! कसबा विधानसभा पोटनिवडणुकी कोण कोण उतरलंय मैदानात? वाचा सविस्तर
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असणारे अदानी चांगलेच आपटले आहेत. आता ते थेट 21 व्या क्रमांकावर गेले आहेत. त्यांच्या संपत्तीमध्ये दररोज कपात होत असून रोज नवीन धक्क्यांना ते सामोरे जात आहेत. अशातच त्यांना आणखी एक जबरदस्त धक्का मिळाला आहे.
आदिलवर केलेल्या मारहाणीच्या तक्रारीनंतर राखी वैद्यकीय तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये रवाना; पाहा VIDEO
आता यावेळी अदानी समूहाला फ्रान्सकडून धक्का बसलाय. फ्रान्सच्या टोटल एनर्जीने (France’s Total Energy) अदानी समूहासोबतचा करार थांबवल्याची माहिती समोर आली आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी ग्रुपवर फसवणुकीचा आरोप केल्यानंतर टोटल एनर्जीने मोठं पाऊल उचललं आहे. त्यामुळे सध्यासाठी 50 अब्ज डॉलर हायड्रोजन (Hydrogen) प्रकल्पातील अदानी समूहासोबत भागीदारी थांबवली असल्याची माहिती फ्रान्सच्या टोटल एनर्जीने दिली आहे.
अजित पवारांचा मोठा खुलासा; राजीनामा दिल्यानंतर बाळासाहेब थोरत फोनवर म्हणाले की…