
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य चांगलेच भोवले आहे. मोदींवर केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली असून सुरत कोर्टाने राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांना मानहानी प्रकरणात दोषी ठरवले असून त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर त्यांना जामीन देखील मंजूर झाला. मात्र दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.
“गद्दारी करणाऱ्याला झटका दिल्याशिवाय…”, भर कार्यक्रमात अजित पवार भडकले
खासदारकी काढून घेतल्याने राजकीय वातावरण चांगलाच तापल्याच आपल्याला पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांची खासदारकी काढून घेतल्याने काँग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली. सोशल मीडियावरही या कारवाईचा निषेध जातोय. त्याचबरोबर काही याला समर्थन करत आहेत तर काहींनी या कारवाईबद्दल नाराजी केली आहे.
राज्याभर ‘सावरकर गौरव यात्रा’ काढणार; एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
यामध्येच आता राहुल गांधी यांना आणखी मोठा धक्का बसला आहे. राहुल गांधी यांना लोकसभेच्या गृहनिर्माण समितीकडून शासकीय बंगला रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबतची माहिती एएनआय या वृत्तसंस्थने दिली आहे. त्यामुळे राहुल गांधींना हा मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
Lok Sabha Secretariat gives notice to Congress leader Rahul Gandhi to vacate government bungalow.
— ANI (@ANI) March 27, 2023
The allotment of the govt bungalow will be cancelled with effect from 23.04.2023. pic.twitter.com/eymsQlPC0n