मागील काही महिन्यांपासून शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाचा? यावरून शिंदे व ठाकरे गटात वाद सुरू होते. दरम्यान निवडणूक आयोगाने याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून शिवसेना ( Shivsena) पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे.
चोर म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचे उत्तर; म्हणाले, “आता तरी…”
एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरुद्ध बंड केलं आणि भाजपचे बोट धरून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. तेव्हापासून शिंदे व ठाकरे गटात पक्ष व पक्षचिन्हावरील दावा आणि सत्तासंघर्षामुळे वाद सुरू होते. दरम्यान काल निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाने यातील एक वाद मिटला आहे.
शिंदे गटाला शिवसेना व धनुष्यबाण मिळताच देवेंद्र फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
दरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्णयाने उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का बसला आहेच. मात्र यासोबतच आणखी एका गोष्टीने ठाकरे गटाला सदमा लागला आहे. ठाकरे गटातील एका खासदाराने शिंदे गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा बंडखोर खासदार कोण? हे अजूनही स्पष्ट झाले नाही. परंतु ठाकरे गटासाठी हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.
“…त्याचा काही परीणाम होत नसतो”, निवडणूक आयोगाच्या निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया