मागील काही महिन्यांपासून शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाचा? यावरून शिंदे व ठाकरे गटात वाद सुरू होते. दरम्यान निवडणूक आयोगाने याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून शिवसेना ( Shivsena) पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाला चांगलाच धक्का बसला आहे.
आता चिन्ह आणि पक्ष जाताच यांनतर पुन्हा एकदा ठाकरे गटाला धक्का बसला आहे. आता विधिमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा आता शिंदे गटाने घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.
शिंदे गटातील आमदारांनी विधिमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालय आम्हाला मिळावं अशी मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) यांच्याकडे केली होती. यासंबंधी राहुल नार्वेकर यांची भेट देखील शिंदे गटाच्या आमदारांनी घेतली होती.
पंकजा मुंडेंचा उद्धव ठाकरेंना फोन! राजकीय वर्तुळात रंगल्या नव्या चर्चा