Ravindra Waikar । मुंबई : उद्धव ठाकरे गटामागच्या अडचणी काही केल्या संपता संपत नाहीत. ठाकरे गटाचे नेते सुरज चव्हाण (Suraj Chavan) आणि किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर वेगवेगळ्या प्रकरणावरून गुन्हे दाखल केले आहेत. अशातच आता उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) निकटवर्तीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. (Latest Marathi News)
Supriya Sule । वडील म्हणून शरद पवार कसे आहेत? सुप्रिया सुळे यांनी सांगितली आठवण
ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्यासह त्यांच्या पत्नीवर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जोगेश्वरीतील भूखंड आणि पंचतारांकित हॉटेल प्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वायकर यांचा जबाब घेतला होता. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी पत्रकार परिषद घेत घोटाळ्याची माहिती काही दिवसांपूर्वी दिली होती.
रवींद्र वायकर यांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दोन लाख स्क्वेअर फूटाच्या भूखंडावर जोगेश्वरीत हॉटेल बांधायची परवानगी दिली असल्याचा आरॊप सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा मुंबई पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला होता. महापालिकेने दोन महिन्यापूर्वी वायकरांना दिलेली परवानगी रद्द केली होती. त्यामुळे या प्रकरणी वायकर यांनी हायकोर्टात धाव घेतली. परंतु हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळली. आता आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणी गुन्हा केल्याने ठाकरे गटाला यांना खूप मोठा धक्का बसला आहे.