सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनाला जवळपास अडीच वर्षे झाली आहेत. चाहते अजून देखील त्याची आठवण काढत असतात आणि अनेकदा त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. आता सुशांतच्या पाळीव कुत्र्याचे देखील निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. सुशांत सिंगची बहीण प्रियंका सिंग हिने तिच्या सोशल मीडियावरून ही बातमी चाहत्यांना कळवली आहे.
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप!
प्रियांकाने तिच्या ट्विटरवरून कुत्र्याच्या मृत्यूची बातमी शेअर केली आहे. प्रियांकाने ट्विटरवर कुत्र्याचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये एका फोटोमध्ये सुशांतने पाळीव कुत्र्याला प्रेमाने पकडून ठेवले आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये प्रियांका देखील दिसत आहे.
मोठी बातमी! लग्नाच्या वरातीतही कोयता गँगने घातला राडा
प्रियांकाच्या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘दी, कृपया मजबूत रहा, मला काय बोलावे ते समजत नाही. अजून एका युजरने लिहिले की, ‘काही सांगण्यासारखं नाही, ही आपल्या सर्वांसाठी खूप हृदयद्रावक बातमी आहे, अशा प्रतिक्रिया युजर्स देत आहेत.
पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशद! झोपलेल्या नागरिकावर कोयत्याने वार