Gautam Adani | सर्वात श्रीमंत म्हणून ओळख असणारे उद्योजक गौतम अदानींची (Gautam Adani) संकटे काही पाठ सोडण्याचे नाव घेत नाही. मागील काही दिवसांपूर्वी अमेरिकन रिसर्च फर्म हिंडनबर्गचा (American research firm Hindenburg) रिपोर्ट पब्लिश झाला. त्यानंतर ‘अदानी ग्रूप’च्या (Adani Group) कंपन्यांच्या शेअर्समध्ये जणू काही वादळच आले आहे. सर्वात जास्त श्रीमंतांच्या यादीतूनही त्यांचे स्थान हळूहळू घसरू लागले आहे. असे असतानाच आता पुन्हा एकदा अदानी साम्राज्याला पुन्हा धक्का बसला आहे.
कारण पुन्हा एकदा अमेरिकेमध्ये गुंतवणूकदारांची चौकशी करण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही चौकशी सुरु होताच क्षणी त्यांचे ५२ हजार कोटी रुपयांचं नुकसान झाले आहे. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार मागील काही दिवसांपासून त्यांच्या गुंतवणूकदारांवर नजर ठेवली होती. त्यामुळे त्यांचे १० पैकी १० शेअर्स (Adani Shares) घसरण झाली आहे.
अदानी समूहाला हिंडनबर्गच्या रिपोर्टमुळे चांगलाच धक्का बसला आहे. त्यामुळे आपल्या गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी समूहाकडून प्रयत्न सुरु होते. मात्र आता पुन्हा एकदा चौकशी सुरु झाल्याने त्यांना चांगलाच धक्का बसला आहे. आता चौकशीमुळे येत्या काळातही अदानी समूहाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.