Site icon e लोकहित | Marathi News

Yash Fan Death । ‘केजीएफ’ स्टार यशच्या आणखी एका चाहत्याचा मृत्यू, भेटायला येताना घडली दुर्दैवी घटना

Yash Fan Death

Yash Fan Death । नुकताच ‘केजीएफ’ (KGF) स्टार यशने (Yash) ३८ वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसानिमित्त एक कार्यक्रम आयोजित केला होता. ७ जानेवारी रोजी कर्नाटकातील गदग जिल्ह्यात त्यांच्या गावात बॅनर उभारताना यशच्या तीन चाहत्यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता, अशातच आता आणखी एका चाहत्याचा मृत्यू झाला आहे. (Latest marathi news)

Bigg Boss 17 । अखेर मुहूर्त ठरला! भाईजानने सांगितला लग्नाचा प्लॅन, म्हणाला…

हा चाहता यशला कर्नाटकला (Karnataka) भेटण्यासाठी जात होता. दरम्यान कर्नाटकातील मुलगुंड येथे त्यांची दुचाकी पोलिसांच्या वाहनाला धडकून हा अपघात झाला आहे. त्याला तातडीने गडग इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (Gadag Institute of Medical Sciences) रुग्णालयात दाखल केले पण त्याचा मृत्यू झाला आहे. निखिल गौडा भीमनगौडा गौडर असे त्याचे नाव आहे. तो बिनकडकट्टी गावातील रहिवासी होता.

Truck drivers strike । मोठी बातमी! टँकर चालकांचे पुन्हा आंदोलन; पेट्रोल-डिझेलची जाणवणार टंचाई

यशच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास तो शेवटचा KGF 2 मध्ये दिसला होता. या चित्रपटाचे दोन्ही भाग संपूर्ण भारतात सुपरहिट झाले होते. चाहते आता पुढच्या भागाची वाट पाहत आहेत. चाहत्यांना तो लवकरच टॉक्सिक: अ फेयरी टेल फॉर ग्रोन अप्स चित्रपटात पाहायला मिळेल. दरम्यान, या चित्रपटात कोण अभिनेत्री असणार? हे अद्याप समजले नाही.

Shocking News । शेकोटी ठरली काळ! उब मिळण्यासाठी चूल पेटवली आणि क्षणात संपूर्ण कुटुंबच संपलं

Spread the love
Exit mobile version