आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था, भारत मार्फत अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. भारतातील पर्यावरण संवर्धन व रक्षण या मध्ये भरीव काम करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा राष्ट्रीय स्तरावरती सत्कार करण्यात येतो. यावर्षी श्रीवर्धमान विद्यालयातील कलाशिक्षक अतुल अभिमन्यू गायकवाड व विज्ञान शिक्षिका नलिनी अतुल गायकवाड यांनी विद्यालयात पर्यावरण संवर्धनासाठी भरीव कामकाज केले आहे.
भीषण अपघात! कंटेनर-ओम्नीची धडक, दोन महिलांचा जागीच मृत्यू
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची निगा राखावी व त्याचे संरक्षण करावे यासाठी विविध उपक्रम राबवले. या उत्कृष्ट कामकाजाची दखल आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत यांनी घेतली. या शिक्षक दाम्पत्याच्या कार्याला प्रेरणा मिळावी या उद्देशाने अतुल गायकवाड यांना कलागौरव पुरस्काराने व नलिनी गायकवाड यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षका पुरस्काराने गौरविण्यात आले. हा सत्कार समारंभ जागतिक पर्यावरण दिन 5 जून 2023 रोजी हिंदी भवन दिल्ली येथे संपन्न झाला.
‘या’ गोष्टी महाराष्ट्राच्या गौरवतेला शोभणारं नाहीत, शरद पवारांची गंभीर प्रतिक्रिया
सदर पुरस्कार प्राप्त झाल्याने श्री वर्धमान विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा लागल्याने व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहणारे गायकवाड दांपत्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मकरंद वाघ, उपाध्यक्ष प्रशांत महामुनी, प्राचार्य हनुमंत कुंभार, उपप्राचार्य अरुण निकम, पर्यवेक्षक काशिनाथ हिरवे, सर्व शिक्षक सहकारी यांनी कौतुक व अभिनंदन केले.
आनंदाची बातमी! मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर केरळमध्ये मान्सून दाखल, हवामान खात्याने दिली माहिती