सैराट (Sairat)चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagaraj Manjule) यांनी ‘झुंड’ हा हिंदी चित्रपट केला. या चित्रपटाला पाहिजे तितका प्रतिसाद मिळाला नाही. आता नागराज मंजुळे पुन्हा एकदा आगळावेगळा प्रयोग घेऊन आपल्यासाठी आले आहेत. गेल्याच वर्षी नागराज मंजुळे यांनी झी स्टुडिओनी एका चित्रपटाची घोषणा केली होती. ‘घर बंदूक बिरयानी’(Ghar Banduk Biryani) चित्रपट आता ७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात फडणवीसांच नाव; चर्चांना उधाण
‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटातील ‘गुन गुन’ हे मागच्या काही दिवसापूर्वी प्रदर्शित झालं होत. या गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता या गाण्याने अनेक चाहत्यांची मन देखील जिंकली. दरम्यान आता ‘घर बंदूक बिरयानी’तील अजून एक गाणं झळकलं आहे. ‘आहा हेरो’ हे गं प्रदर्शित झालं आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
“एका महिलेने चिंचवडमध्ये पाडलं”, निलेश राणे यांची अजित पवारांवर जोरदार टीका
हे गाणे सयाजी शिंदे आणि आकाश ठोसर यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्याला देखील चाहते चांगला प्रतिसाद देताना दिसतायेत. हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. सध्या या गाण्याचं ट्रेंड आल्याच पहायला मिळत आहे.
संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याची पोलिसांकडून चौकशी सुरू; घटनेचे CCTV फुटेज देखील आले समोर
या गाण्याविषयी बोलताना संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र म्हणतात की , ”चित्रपटातील गाणं हे फक्त गाणं नसून कोणाच्या तरी आयुष्याचा प्रवास असतो, नागराज सरांसोबत मी याआधी देखील काम केलं आहे. चित्रपटाच्या अनेक छोट्या गोष्टींकडे त्यांचे खूप लक्ष असते. संगीतामध्येही त्यांचा सहभाग असतो. त्यामुळे या सर्व गोष्टी आपसुकच जुळून येतात.” असे ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यावेळी म्हणाले आहेत.
“माझा टीशर्ट ४५ हजार रुपयांचा….” कपडे, दागिने, बूट याबद्दल एमसी स्टॅनने केला मोठा खुलासा