
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड पुकारून भाजपशी युती केली. दरम्यान एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि देवेंद्र फडणवीस यांनी मिळून सरकार स्थापन केले.यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्री झाले. दरम्यान आता राज्याच्या या शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात आता ‘मुख्यमंत्री किसान योजना’ (CM Kisan yojana) लागू करण्यात येणार आहे.
ही योजना केंद्रातील पंतप्रधान किसान योजनेच्या (pm kisan yojana) पार्श्भूमीवर सुरू करण्यात आली आहे. अशाचप्रकारची योजना लवकरच महाराष्ट्रात राज्य सरकारकडून लागू केली जाणार आहे.तसेच ‘मुख्यमंत्री किसान योजना’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाअखेरीस सहा हजार रुपये मिळणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे लवकरच या योजनेसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या निकषांबाबत निर्णय जाहीर केला जाणार आहे.
ड्रॅगन फ्रुट,किवीसारख्या विदेशी फळांची करा लागवड, ‘या’ योजनेअंतर्गत मिळेल अनुदान
2018 मध्ये केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी पंतप्रधान किसान योजना सुरू करण्यात आली आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून दरवर्षी सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात.हे सहा हजार दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना वितरण केले जाते.
Bjp: दिंडोशीमध्ये गणेश विसर्जनाच्यावेळी भाजपच्या दोन गटांमध्ये झाला तुफान राढा