नाशिकमध्ये पुन्हा एकदा भीषण अपघात! चालत्या बसने घेतला पेट

Another terrible accident in Nashik! A moving bus caught fire

नाशिक जिल्ह्यामध्ये मागच्या काही दिवसापूर्वीच एसटी बसने पेट घेल्याची घटना घडली होती. नाशिकमधील अपघात काही थांबायचं नावच घेत नाहीत. नाशिकमध्ये सतत अग्नितांडव सुरूच आहे. आता पुन्हा एकदा अशीच एक धक्कदायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या चांदवड घाटामध्ये बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

Gautami Patil: गौतमी पाटील एका कार्यक्रमासाठी घेते ‘इतकं’ मानधन!

या घटनेमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे, मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटना अशी घडली की, नाशिककडे (Nashik) येणारी बस चांदवड (Chandwad) घाटामध्ये आली असता बसने अचानक पेट घेतला. यावेळी बस चालक आणि कंडक्टरने सर्व प्रवाशांना लवकरात लवकर खाली उतरवले.

बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरण सोहळ्यात उद्धव ठाकरेंना का डावलले? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असून बस चालकामुळे आणि कंडक्टरमुळे मोठा अनर्थ टळला आहे. नाशिकमधील चांदवडच्या घाटात चालत्या बसने पेट घेतला, या बसमध्ये जवळपास ३५ प्रवाशी होते. कंडक्टर आणि बस चालक यांच्या सावधानतेमुळे ३५ प्रवाशांचा जीव वाचला आहे.

‘वेड’ चित्रपटामध्ये होणार मोठे बदल; रितेश देशमुखने केली मोठी घोषणा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *