मागच्या चार पाच दिवसापूर्वी ओडिशाच्या (Odisha) बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीचा भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये अनेकांनी आपला जीव गमावला. हा अपघात ताजा असतानाच आता पुन्हा एकदा ओडिशामध्ये भीषण अपघात झाला आहे. ओडिशातील जाजपूर रोड रेल्वे स्थानकावर बुधवारी मालगाडीने ७ मजुरांना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
चंद्रपूर लोकसभेची जागा रिक्त, बाळू धानोरकर यांच्या जागी कोण लढणार? ‘या’ नेत्यांची नावे चर्चेत
हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये ६ मजुरांचा मृत्यू झाला तर दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. अचानक पाऊस आल्याने मजुरांनी उभ्या असलेल्या मालगाडीचा आसरा घेतला आणि त्यांनतर अचानक मालगाडी सुरु झाली. मजुरांना देखील त्यामधून बाहेर पडता त्यामुळे त्या मजुरांचा जागीच मृत्यू झाला.
धक्कादायक! अल्पवयीन भाच्याने मामीला केले ब्लॅकमेल; मामीने उचलले थेट टोकाचे पाऊल
या अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.