अधिकारी होताच पतीला धोका देणाऱ्या ज्योती मौर्य प्रकरणात आणखी एक ट्विस्ट, पतीने थेट केले गंभीर आरोप

PCS

सध्या पत्नीने पतीला धोका देण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. मागील काही दिवसांपासून एसडीएम ज्योती मौर्य (Jyoti Maurya) आणि आलोक मौर्य (Alok Maurya) हे नाव सतत चर्चेचा विषय ठरत आहे. चतुर्थ श्रेणीत नोकरी करत असणाऱ्या आलोक मौर्य यांनी त्यांची पत्नी ज्योती मौर्यला उच्च शिक्षण देऊन पीसीएस (PCS) अधिकारी केले. परंतु अधिकारी होताच पत्नीने पतीला मोठा धोका दिला. (Latest Marathi News)

भाजपला पुन्हा मोठे खिंडार! चार माजी नगरसेवक आणि 500 कार्यकर्त्यांनी केला बीआरएसमध्ये प्रवेश

आता या प्रकरणी अनेक खुलासे दिवसेंदिवस समोर येत आहेत. पीसीएस अधिकारी होताच ज्योतीला चतुर्थ श्रेणीत नोकरी करणाऱ्या आलोक मौर्य यांची लाज वाटू लागल्याने तिने पतीला सोडून दिले, असा आरोप पती आलोक मौर्य यांनी केला आहे. तसेच ज्योती मौर्य यांनी फसवणूक करत पहिली नोकरी मिळवली असल्याचा खळबळजनक आरोप मौर्य यांनी केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Gautami Patil । गौतमीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी! ‘घुंगरू’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ढकलली पुढे; कारण…

दरम्यान, पत्नी ज्योती मौर्यने पती आलोक मौर्य आणि त्यांच्या कुटुंबीयांवर हुंड्याची मागणी आणि छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी त्यांनी धुमणगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत धुमणगंज (Dhumanganj) पोलीस अधिक तपास करत आहेत.

NCP Crisis । शरद पवार यांना मोठा झटका, कारमधून प्रवास करणारा आमदार अजित पवारांच्या गोटात

Spread the love