सोलापूर: राज्यभरात सध्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. दरम्यान कॉपीमुक्त परीक्षेसाठी परीक्षा मंडळाकडून विविध उपाय योजना करण्यात आल्या आहेत. मात्र, तरी देखील सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील दहावी परीक्षा केंद्रावर ( SSC Board Centre) एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
संदीप देशपांडे हल्लाप्रकरणात पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती
भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यु हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील दहावी परीक्षा केंद्रावर काल (ता.3) मराठीच्या पेपरला सामूहिक कॉपीचा प्रकार घडला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे शिक्षक देखील यामध्ये सामील होते. शिक्षकांनी प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे चक्क फळ्यावर लिहून देण्याचा प्रकार याठिकाणी घडला आहे.
अबब! चक्क गाढवाच्या दुधाला मिळतोय सोन्याचा भाव; वाचा नेमकी काय आहे भानगड?
सामूहिक कॉपीचा हा प्रकार पाहून वर्षभर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र पेपर लिहितानाच रडू फुटले. आम्ही वर्षभर अभ्यास केला त्याचे काय? असा सवाल या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा शिकवणाऱ्या शिक्षकांनीच या गैरप्रकारात महत्त्वाची भूमिका बजावल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते.
धक्कादायक! कोरोना लस बनवणाऱ्या वैज्ञानिकाची केली गळा आवळून हत्या