Supriya Sule । संसदेचं विशेष अधिवेशन (Convention) सुरु झालं आहे. संसदेतील कामकाजावर संपूर्ण देशाचं लक्ष आहे. नुकतीच महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आमनेसामने येत आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या (BJP) खासदाराविरोधी हक्कभंग प्रस्तावाची नोटीस दिली आहे. (Latest Marathi News)
Buldhana Accident । समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर
चांद्रयान-३ बाबत चर्चेवेळी भाजप खासदार रमेश बिधुडी (Ramesh Bidhudi) बोलत होते, त्यावेळी त्यांना बसपा खासदार दानिश अली (Danish Ali) यांनी मध्येच थांबवलं. त्यामुळे बिधुडी यांनी त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले. आता या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटल्याचे पाहायला मिळत आहेत. विरोधी पक्षांकडून बिधुरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सुप्रिया सुळेंनी लोकसभा सचिवालयाकडे बिधुरू यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस पाठवली असून बिधुडी यांच्या वक्तव्यामुळे लोकसभेच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचत आहे. त्यांचे हे वक्तव्य हक्कभंगत बसत आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. अशातच आता लोकसभा सचिवालय त्यांच्यावर कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Heavy Rain । क्षणात डोळ्यासमोरून वाहून गेलं सर्वकाही, मुसळधार पाऊस आणि ढगफुटीने जनजीवन विस्कळीत
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांनी बिधुरी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत त्यांनी संसदेची प्रतिष्ठा राखण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील बिगुरी यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचे संसदीय कामकाजातून वक्तव्य वगळले जाऊ शकते.