Site icon e लोकहित | Marathi News

Anupam Kher: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अनुपम खेर नाराज, ट्विट करत म्हणाले…

Anupam Kher is upset with the Supreme Court's decision, tweeting...

मुंबई : यावर्षी विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेला यावर्षी ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात १९९० साली काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय आणि त्यांचा नरसंहार दाखवण्यात आला होता. या चित्रपटाने ३०० कोटी रुपयांची कमाई केली.परंतु हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारविरोधात पुन्हा एकदा आवाज उठवण्यात आला.

Devendra Fadnavis: “नवनवीन वादाचे विषय काढू नका, मी केवळ..”, फडणवीसांनी आज पुण्यात येण्याचं कारण केलं स्पष्ट

‘एसआयटी’द्वारे चौकशी करण्यासाठी एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.दरम्यान आज दुपारी याचा निकल लागला असून कोर्टाने ही याचिका फेटाळली असल्याचं समोर आलं आहे. कोर्टाच्या या निर्णयावर अनुपम खेर निराश झाले आणि त्यांनी यावर प्रतिक्रिया देत ट्विट केले.अनुपम खेर यांनी ट्वीट करत लिहिले, “निराश आणि दुःखी!”

Aditya Thackeray: उत्सवाच्या काळात राजकारण करेल तो बालिशपणा असेल, आदित्य ठाकरेंनी विरोधकांचे टोचले कान

कोर्टाचा निकाल लागण्याच्या काही तसांपूर्वी त्यांनी ट्वीटही केले होते की, “माननीय सर्वोच्च न्यायालय! काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराला ३२ वर्षांहून अधिक काळानंतर, भारतातील सर्वात शांतताप्रिय समुदायांपैकी एकावर झालेल्या अत्याचाराच्या एसआयटी चौकशीसाठीच्या याचिकेवर तुमची सुनावणी होईल. तुमचा आजचा निर्णय न्यायासाठी आवश्यक उपचार प्रक्रिया सुरू करू शकतो,” असे म्हटले होते.

Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतलं पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचं दर्शन, पाहा PHOTO

Spread the love
Exit mobile version