एखाद्या क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तीच्या वक्तव्यांचा त्या क्षेत्रावर फार मोठा फरक पडत असतो. त्यातल्या त्यात एकाच क्षेत्रातील प्रतिस्पर्ध्यांनी एकमेकांबद्दल वक्तव्य केले तर मात्र आणखी गोंधळ उडतो. सध्या चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माता अनुराग कश्यप ( Director & Producer Anurag Kashyp) यांचे एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी मराठी मधील एक प्रसिद्ध चित्रपट व दिग्दर्शकावर वक्तव्य केले आहे. चित्रपटसृष्टीतल्या स्पर्धेबद्दल आणि चित्रपटांच्या पातळीबद्दल याठिकाणी ते बोलत होते.
Nilesh Lanke: आमदार निलेश लंके यांनी घेतले उपोषण मागे
एखादा चित्रपट हिट झाला की, तिथे तशाच प्रकारचे चित्रपट बनवण्याची स्पर्धा सुरू होते. असं मत व्यक्त करत यावेळी अनुराग कश्यप यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे याच्या ‘सैराट’ (Sairat) या चित्रपटावर निशाणा साधला. ” सैराटने मराठी चित्रपट सृष्टीला बदनाम केलं” अशी मोठी टीका अनुराग कश्यप यांनी केली आहे. कहर म्हणजे याठिकाणी स्वतः नागराज मंजुळे देखील उपस्थित होते. चित्रपट सृष्टीत चांगल्या चित्रपटांची पातळी वाढण्याची गरज आहे असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला.
धक्कादायक! क्रिकेट खेळत असताना हृदयविकाराचा झटका येऊन दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
‘Galatta Plus’ यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अनुराग कश्यप व नागराज मंजुळे उपस्थित होते. दरम्यान झालेल्या मुलाखतीमध्ये अनुराग कश्यप यांनी ‘सैराट आणि ‘कांतारा’ या चित्रपटांची तुलना केली. यावेळी बोलताना अनुराग कश्यप म्हणाले की, नागराजने आणि मी चर्चा केली होती की सैराटने मराठी चित्रपटसृष्टी उध्वस्त केली आहे. कारण, याचित्रपटाच्या यशामुळे एखाद्या चित्रपटात एवढे पैसे कमावण्याची ताकद असते हे सगळ्यांना ठाऊक झाले. त्यामुळे त्यांनी ‘सैराट’ ची कॉपी केली. नंतरच्या काळात वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनवणे बंद झाले. खरंतर एखादा चित्रपट चांगला चालला की लोक त्यातून काय शिकतात हे महत्त्वाचे आहे.
ब्रेकिंग! बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात ईशान किशनच्या तुफानी 150 धावा