मुंबई : “यांना आरक्षण पाहिजे, आता म्हणतात ओबीसी मधून पाहिजे, उद्या म्हणतील एस सी मधून पाहिजे”, असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) म्हणाले होते. मराठ्यांना आरक्षण नको आहे अशी समिती त्या सरकारने स्थापन केली होती. त्यामुळे आरक्षण देखील मिळाले नाही, असा देखील उल्लेख तानाजी सावंतांनी केला होता. आता या प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) यांनी सावंतांना इशारा दिलाय.
व्हायरल व्हिडीओने फेमस झालेल्या अहमदनगरच्या शाळकरी मुलाला अजय-अतुलने दिली चित्रपटात गाण्याची संधी
सावंत यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांची खाज उतरविल्याशिवाय राहणार नाही असा गंभीर इशारा संभाजी ब्रिगेडने दिलाय. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही संभाजी ब्रिगेडची ३० वर्षांपासूनची मागणी आहे. तानाजी सावंत यांच्यासारख्या मराठ्यांमुळे गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलं नाही, असा निषेध देखील संभाजी ब्रिगेडने केलाय.
दरम्यान, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी माफी मागितली असून त्यांनी केलेल्या विधानाने सर्वांच लक्ष वेधून घेतलय. दरम्यान, 2024 पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर हा तानाजी आपल्या पदाचा राजीनामा देऊन मराठा समाजाबरोबर मोर्चात तुमच्याबरोबर शामिल होईल, असं आश्वासन देखील तानाजी सावंतांनी दिलाय.
मोठी बातमी! राज्यातील शिवभोजन थाळी योजना बंद होण्याची शक्यता