Maharashtra Politics । काँग्रेसला भलंमोठं खिंडार! लोकसभेच्या तोंडावर माजी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सूनेने केला भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra Politics

Maharashtra Politics । ऐन निवडणूक (Loksabha) काळात राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला गळती लागली आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सतत धक्क्यांवर धक्के बसत आहेत. अशातच काँग्रेसला (Congress) पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. (Latest marathi news)

Congress । मोठी बातमी! काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या वाटेवर, भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ

लातूरमध्ये काँग्रेसला खूप मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर (Shivraj Patil Chakurkar) यांच्या सून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर (Archana Patil Chakurkar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसला खूप मोठा धक्का बसला आहे.

Lok Sabha Election । मोठी बातमी! राहुल गांधींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या भाजप उमेदवारावर तब्बल 242 गुन्हे दाखल

तसेच उदगीरचे 7 वेळा नगराध्यक्ष असलेले राजेश नितुरे (Rajesh Niture) यांनी देखील आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मागील दहा वर्षात अनेक मोठी कामे केली आहेत. विकासाच्या कामाने देशाची प्रगती झाली आहे. नरेंद्र मोदींनी महिलांसाठी नारी शक्ती वंदन बिल आणले. त्यांच्या या निर्णयामुळे मी प्रभावित झाले आणि भाजपमध्ये येण्याचा मी निर्णय घेतला,” असे स्पष्टीकरण अर्चना पाटील यांनी दिले आहे.

Narendra Modi । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला सर्वात मोठा खुलासा

Spread the love