बारामती शहरात विद्यार्थी सुरक्षित आहेत का? वाढत्या गुन्हेगारीमुळे ‘एज्युकेशन हब’ ला गालबोट!

Are students safe in Baramati city? Due to the increasing crime, the 'Education Hub' is cheeky!

बारामती: शरद पवार यांच्यामुळे फक्त राज्यातच नाही तर संपूर्ण देशात बारामतीची एक वेगळी ओळख आहे. आर्थिक भरभराटीची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहराचा विकास देखील मोठ्या प्रमाणात झालाय. येथे असलेल्या शैक्षणिक सोयीसुविधांमुळे ‘एज्युकेशन हब’ म्हणून बारामतीची ओळख निर्माण होत आहे. जवळपास सर्वच क्षेत्रातील विविध कोर्सेस बारामतीमधील कॉलेजेस मध्ये उपलब्ध असल्याने येथे आजूबाजूच्या बहुतेक जिल्ह्यांतून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात.

चंद्रकांत पाटलांनी शाईफेकीचा धसका घेतला? सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होताना केला फेसशिल्डचा वापर!

पुणे, मुंबई यांसारख्या मेट्रो शहरांच्या तुलनेत स्वस्त व मस्त शैक्षणिक सोयीसुविधा यामुळे शिक्षणासाठी बारामतीला पसंती मिळतीये. मात्र, मागील काही दिवसांपासून बारामती शहरात तरुणाई मध्ये गुन्हेगारी वृत्तींचे प्रमाण वाढत आहे. येथील सुप्रसिद्ध महाविद्यालयांच्या परिसरात मारामारीचे प्रकार देखील पहायला मिळतात. दरम्यान काल तर चार- पाच तरुणांच्या टोळीने दहशत पसरवण्यासाठी कोयता व तलवारी चा वापर करून महाविद्यालय परिसरात तोडफोड करण्याचा प्रकार घडला आहे.

धक्कादायक! बारामती मध्ये कोयते आणि तलवार वापरून राडा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

यामध्ये स्थानिक मुलांचा सहभाग जास्त प्रमाणात आहे. कौटुंबिक आर्थिक सुबत्ता, राजकीय आधार व पोलिसांकडून होणारे दुर्लक्ष यामुळे असे प्रकार घडू लागले आहेत. मात्र, यामुळे बारामती शहरात बाहेरून शिक्षणासाठी येणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भविष्याची स्वप्न डोळ्यात घेऊन या शहरात शिकायला येणाऱ्या या मुलांच्या डोळ्यात जर राजरोसपणे हिंडणाऱ्या गुहेगारांची भीती आणि दहशत दिसत असेल तर काय असेल यांचं भविष्य?

7 वर्षे झाली पण बिर्याणीच भारतीयांची फेव्हरेट! स्विगीने केला मोठा खुलासा…

दूर कुठंल्याश्या गावात या मुलांच्या भविष्यासाठी कष्ट करणारे पालक जेव्हा या महाविद्याल परिसरात होणाऱ्या गुन्हेगारीच्या बातम्या वाचत असतील, तेव्हा त्यांच्या मनात काय वादळ उठत असेल ? हे वातावरण पाहून उद्या ते त्यांची मुलं इथं शिकायला पाठवतील का ? असे एक ना अनेक प्रश्न सध्या उपस्थित राहतायत. यावर उत्तर कधी मिळणार माहीती नाही. इथल्या प्रस्थापितांना या प्रश्नांची ओळख तरी झालीय की नाही हे सुद्धा माहिती नाही. मात्र, इतक्या वर्षांच्या प्रयत्नांनी उभ्या राहिलेल्या या ‘एज्युकेशन हब’ ला गुन्हेगारीमुळे लागलेले गालबोट गंभीर आहे एवढं मात्र नक्की!

“…अन्यथा महाराष्ट्र पेटून उठेल”; महाविकास आघाडीच्या महामोर्चात शरद पवार कडाडले

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *