सैराट, फँड्री, नाळ आणि झुंडच्या यशानंतर प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व लेखक नागराज मंजुळे यांचा घर बंदूक बिर्याणी हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात आकाश ठोसर, सयाजी शिंदे, सायली पाटील हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. येत्या 7 एप्रिलला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
संभाजीराजे छत्रपतींच्या पत्नीच्या पोस्टने उडाली खळबळ! पाहा नेमकं काय म्हंटलय पोस्टमध्ये?
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नागराज मंजुळे, आकाश ठोसर, सयाजी शिंदे, सायली पाटील हे महाराष्ट्र्भर दौरा करत आहे. यानिमित्ताने अनेक ठिकाणी बोलताना नागराज मंजुळे यांनी सैराट, फॅन्ड्री, झुंड या चित्रपटांच्या काही आठवणी देखील शेअर करत आहेत. दरम्यान मागच्या काही दिवसापूर्वी त्यांनी सैराट चित्रपटातील आर्चीची भूमिका रिंकू राजगुरूला नव्हे तर सायली पाटीलला देण्यात येणार होती मात्र सायलीने ती भूमिका स्वतः नाकारली होती. असा मोठा खुलासा नागराज मंजुळे यांनी केला होता.
राम नवमीच्या मुहूर्तावर प्रथमेश परबने चाहत्यांना दिली मोठी गुडन्यूज!
आर्चीची भूमिका नाकारल्याचं वाईट वाटतं आहे का?, असं प्रश्न एका मुलाखतीत सायली पाटीलला विचारण्यात आला. यावर उत्तर देत सायलीने नाही म्हणत त्यामागचं कारण देखील सांगितलं आहे. याबाबत बोलताना सायली म्हणाली, ‘मी पुण्यात आर्किटेक्चरचं शिक्षण घेत होते आणि कॉलेजमध्ये ऑडिशन सुरू होत्या. म्हणून मी सहज ऑडिशन दिल होत. मात्र यामध्ये माझं सिलेक्शन झालं असून देखील मी याला नकार दिला. यानंतर सैराट चित्रपटाला चांगले यश देखील मिळाले. मात्र मी त्या चित्रपटामध्ये भूमिका साकारली नाही याच मला काहीच वाटत नाही कारण मी अभिनय करायचा आहे असं ठरवलच नसल्याचं सायली यावेळी म्हणाली आहे.