Site icon e लोकहित | Marathi News

Arijit Sinh | मोठी बातमी! अरिजीत सिंह याला मोठी दुखापत

Arijit Singh Big news! Big injury to Arijit Singh

एक प्रसिध्द पार्श्वगायक म्हणून अरिजीत सिंह ( Arijit Sinh) ओळखला जातो. त्याची गाणी प्रेक्षकांच्या मनावर कायम अधिराज्य करतात. सोशल मीडियावर त्याची जबरदस्त फॅन फॉलोविंग ( Fan Following) आहे. इतकंच नाही तर अरिजीत सिंहच्या शोला सुद्धा चाहत्यांची प्रचंड मोठी गर्दी असते. एकीकडे भरपूर चाहते असणे चांगले देखील आहे तर दुसरीकडे याच चाहत्यांमुळे सेलिब्रिटींना अनेकदा त्रास होतो. दरम्यान अरिजीत सिंहच्या बाबतीत पण चाहत्याकडून एक गैरप्रकार झाला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ( Viral video)

हवालदाराची पत्नी एका रूममध्ये प्रियकरासोबत करत होती रोमांस, माहिती मिळताच घडलं असं की…

अरिजीत सिंहच्या एका शो मधला हा व्हिडीओ आहे. यामध्ये तो आपल्या चाहत्यांसोबत हात मिळवून गप्पा मारत आहे. दरम्यान यावेळी अरिजीतला एका चाहत्यामुळे गंभीर दुखापत झाली आहे. या शोमध्ये एक महिला जबरदस्तीने अरिजीत सिंहचा हात पडकत आहे. यावेळी अरिजीत सिंहला हात मिळवायचा न्हवता. मात्र ती महिला अरिजीत सिंहचा हात जोरात ओढते.

शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार? सत्तासंघर्षाचा निकाल अवघ्या काही दिवसांत लागणार

यामुळे अरिजीत सिंहचा बॅलन्स जाऊन त्याच्या हाताला मोठी दुखापत होते. दरम्यान संतापलेला अरिजीत सिंह त्या महिलेला ओरडतो. ” तुमच्या अशा विचित्र वागण्याने मला माझा हात सुद्धा हलवता येत नाहीय. तुम्ही माझा हात का ओढला? आता मला त्याची हालचाल करताना त्रास होतोय. तुमच्या अशा वागण्याने हा शो सुद्धा रद्द होऊ शकतो ! ” असे अरिजीत सिंहने म्हणताच ती महिला त्याची माफी मागते. अरिजीत सिंहच्या चाहत्यांनी या व्हिडीओखाली संतापलेल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

धक्कादायक! नवविवाहित जोडपे रात्री झोपण्यासाठी बेडरूम मध्ये गेले; मात्र त्यांनतर असं घडलं की दोघेही…

Spread the love
Exit mobile version